Breaking News

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात!

नवी दिल्ली, दि. 31 - आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सदनांना संबोधित करतील. यानंतर उद्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरुण जेटली 2017-18 चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. यंदाचे अधिवेशन दोन टप्प्यात चालणार असून, पहिल्या टप्प्यातील कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत चालेल.
संसदेच्या दोन्ही सदनाला राष्ट्रपती संबोधित केल्यानंतर, अर्थमंत्री अरुण जेटली आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लगेचच अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण आहवाल सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.