Breaking News

सातव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून सानिया फक्त एक पाऊल दूर

मुंबई, दि. 29 - भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा कारकीर्दीतलं सातवं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सानिया मिर्झा आणि  क्रोएशियाचा इवान डॉडिग या जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. सानिया आणि डॉडिगसमोर अमेरिकेची अ‍ॅबिगेल स्पिअर्स आणि  कोलंबियाचा युआन सबॅस्टियन काबाल यांचं आव्हान असेल. हा सामना रविवारी रॉड लेव्हर अरेनात खेळवला जाईल.
सानिया आणि इवान जोडीनं उपांत्य फेरीत समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ या ऑस्ट्रेलियाच्या जोडीवर 6-4, 2-6, 10-5 असा विजय मिळवला. सानियानं  याआधी मिश्र दुहेरीत तीन आणि महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम विजेतेपदं मिळवली होती.