भिलवडी बलात्कारप्रकरणी एक आरोपी अटकेत
सांगली, दि. 15 - भिलवडी जवळील माळवाडीमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन, तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलं आहे. माळवाडीमधील एका 26 वर्षीय तरुणाने लैंगिक आत्याचार करुन खून केल्याचे तपासात स्पष्ट झालं असून, आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
6 जानेवारी रोजी भिलवडी तालुक्यातील माळवाडीमध्ये 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन, तिची हत्या केल्याची घटना उघड झाली. यानंतर तालुक्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना आठ दिवसांनी यश आले, असून या प्रकरणी प्रशांत ऊर्फ हिमेश सोंगटे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये आणखी काहीजणांचा समावेश असू शकतो, अशी शक्यता असून पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या संदर्भातील पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.