नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांमुळे तब्बल 45 जण लक्षाधीश
मुंबई, दि. 15 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांवर लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीसं देण्याची योजना घोषित केली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. कॅशलेस पेमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत 45 जण लखपती झाले आहेत. सरकारकडून 25 डिसेंबरला ही योजना घोषित करण्यात आली होती. आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणार्या नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस दिली जाणार आहेत.
एनसीपीआयच्या वेबसाईटवर यासंबंधीचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यात 15 भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत, ज्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे. तसंच 614 विजेत्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय. 6500 विजेत्यांना प्रत्येक आठवड्याला 10 हजार रुपये देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर 15 हजार विजेत्यांना 1 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. ही बक्षीसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे.