अहमदनगरमध्ये नायलॉन मांजाची पतंगबाजी तरुणाच्या जीवावर
अहमदनगर, दि. 15 - अहमदनगरला नायलॉन मांजाची पतंगबाजी तरुणाच्या जीवावर बेतली आहे. दुचाकीवरुन जाताना नायलॉन मांजानं गळा चिरल्यानं महेश नेरकर अत्यवस्थ आहे. सध्या महेशवर खासगी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु आहेत. महेश आज दुपारी न्यू आर्टस सायन्स कॉलेजच्या मुख्य रस्त्यावरुन दुचाकीवरुन आपल्या घरी जात होता. यावेळी अचानक चायना मांजा गळ्याला अडकून त्याचा गळा चिरला गेला. या दुर्घटनेनंतर तो दुचाकीवरुन खाली फेकला गेला.
त्यातच पाठीमागील दुसर्या एका दुचाकीनं त्याला धडक दिल्यानं त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. सध्या त्याला उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनीही त्याची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे सांगितलं. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात महेशचं लग्न असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर होत आहे. याप्रकरणी कालच हरित लवादाच्या निर्णयाने घातलेली बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिला होता.