Breaking News

आयआयटीमध्ये विद्यार्थिनींना आरक्षण, प्रवेश घटल्याने शिफारस

नवी दिल्ली, दि. 16 - आयआयटीमध्ये मुलींचा घटणारा टक्का वाढवण्यासाठी त्यांना आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. एकूण जागांच्या तुलनेत विद्यार्थिनींना 20 टक्के आरक्षण देण्याची शिफारस होत आहे. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थिनींचे कमी होणारे प्रवेश चिंताजनक आहेत. त्यामुळे आयआयटी प्रवेशासंदर्भातील एका समितीने ही महत्त्वाची मागणी केली आहे.
महत्त्वाचं म्हणजं या आरक्षणाचा पुरुषांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये आधीच उत्तीर्ण  झाले आहेत, त्यांचा विचार केला जाणार आहे. संयुक्त प्रवेश मंडळ यासंदर्भात चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार आहे. यावर्षीपासून किंवा 2018 पासून या  निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.