डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार!
वॉशिंगटन, दि. 20 - डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आज ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. डोनाल्ड टम्प गुरुवारी रात्रीच कुटुंबासह वॉशिंगटनमध्ये दाखल आहे. शपथविधीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे नऊ लाख लोक उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंगटनला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या तब्बल 60 खासदारांनी शपथविधीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला भारताकडून कोणताही नेता सहभागी होणार नाही. अमेरिकेतील भारताचे राजदूतच सोहळ्याला उपस्थित राहतील. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना अध्यक्षपदाची शपथ देतील. डोनाल्ड ट्रम्प दोन बायबल घेऊन शपथ घेणार आहे. यामध्ये अब्राहम लिंकन यांनी शपथ घेतलेल्या बायबलचा आणि ट्रम्प यांच्या आईने भेट दिलेल्या बायबलचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी उपराष्ट्रपती माईक पेंस शपथ घेतली. यावेळी ट्रम्प देशाला संबोधित करतील.