अक्षय कुमारचे 2017 मध्ये हे सिनेमे प्रदर्शित होणार
मुंबई, दि. 02 - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमांची माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत अक्षय कुमारने 2017 मध्ये प्रदर्शित होणार्या सिनेमांचे पोस्टरही शेअर केले. आपल्यासाठी 2017 हे वर्ष अत्यंत व्यस्त असणार आहे. मागे वळून पाहायला वेळ नाही, कारण पुढे जायचंय. तुमच्या शुभेच्छा असू द्या, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.
या वर्षात रिलीज होणारा पहिला सिनेमा ‘जॉली एलएलबी 2’ चं पोस्टर अक्षय कुमारने शेअर केलं. हा सिनेमा 10 फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. यानंतर ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा सिनेमा 2 जून 2017 रोजी रिलीज होईल. त्याचंही पोस्टर अक्षय कुमारने शेअर केलं. ‘2.0’ हा अक्षय कुमारचा 2017 मधील तिसरा सिनेमा असेल. या सिनेमात अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत एकत्र दिसणार आहेत. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमारचा वर्षातील शेवटचा सिनेमा असेल. त्याचे वर्षात नेहमी तीन ते चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी त्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या सिनेमांची यादी प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.