स्नॅपडील ‘वेलकम 2017’ सेल, 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
मुंबई, दि. 08 - नव्या वर्षाच्या स्वागतासाठी स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने ऑफर जाहीर केली आहे. कपडे, मोबाईल, होम अप्लायन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर स्नॅपडीलकडून 70 टक्क्यांपर्यंक सवलत दिली जाणार आहे.
8 जानेवारी आणि 9 जानेवारी या दोन दिवशी स्नॅपडीलचा ‘वेलकम 2017’ सेल आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सकडून कोणत्या ऑफर जाहीर होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. अखेर आज (शनिवार) स्नॅपडीलने ‘वेलकम 2017’ सेल जाहीर करत इतर ई-कॉमर्स वेबसाईटच्या शर्यतीत बाजी मारली आहे. ग्राहकांकडे एसबीआय क्रेडिट कार्ड असल्यास 15 टक्के अधिकची सवलत मिळवू शकतात. नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेकजण वेगवेगळी खरेदी करत असतात. त्यामुळे सवलती किंवा ऑफरमधील वस्तूंनाही अनेकदा पसंती दिली जाते. त्यामुळे स्नॅपडीलचा ‘वेलकम 2017’ सेल ग्राहकांना पर्वणीच ठरणार आहे.