मुदत ठेवीवर स्टेट बँकेकडून मिळणार क्रेडिट कार्ड
नवी दिल्ली, दि. 22 - कोणत्याही बँकेत 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक मुदत ठेव असल्यास अशा ग्राहकांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय स्टेट बँकेची उपकंपनी स्टेट बँक कार्ड्सने घेतला आहे. या कार्डवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. या कार्डांसाठी उत्पन्नाचा पुरावा आणि पूर्वीच्या आर्थिक व्यवहारांच्या माहिती व्यतिरिक्त दिले जाणार आहे.
देशातील 100 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनाही क्रेडिट कार्ड देण्याच्या प्रस्तावावर स्टेट बँक कार्ड्स विचार करत आहे. स्टेट बँक कार्डने क्रेडिट कार्ड देण्याच्या बाबतीत आयसीआयसीआय बँकेलाही मागे टाकले आहे. सुरूवातीला ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठीच असणार आहे, असे स्टेट बँक कार्ड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जसूजा यांनी सांगितले. स्टेट बँक लवकरच पाच लाख स्वाईप मशीन्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. स्टेट बँकेच्या खातेधारकांना जानेवारी महिन्यात ही कार्ड्स देण्यात येणार आहेत, तर विद्यार्थ्यांना याच महिन्याच क्रेडिट कार्ड्स देण्यात येणार आहेत.