Breaking News

बुग्ती हत्याकांड : परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

इस्लामाबाद, दि. 22 - बलुचिस्तान उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सक्त ताकीद देत न्यायालयात हजर  राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्या विरोधात रेड वॉरंट जारी करण्यात येईल, असा इशारा अकबर खान बुग्ती यांच्या मुलाने  दाखल केलेल्या याचिकेवर सुनावरणी करताना खंडपीठाने हा आदेश दिला. अकबर खान बुग्ती यांची हत्या केल्याच्या आरोपातून कनिष्ठ न्यायालयाने त्यांची निर्दोष  मुक्तता केली होती. यानंतर कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांच्या मुलाने बलुचिस्तान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुशर्रफ यांची न्यायालयात हजर राहण्याची एक निश्‍चित तारीख सांगण्यात यावी, असे न्यायालयाने मुशर्रफ यांच्या वकीलाला सांगितले. सुरक्षेची हमी आणि प्रकृती  ठिक झाल्यानंतरच ते न्यायालयात हजर राहू शकतील. ते 23 मार्च रोजी मायदेशी परतणार आहेत, असे त्यांच्या वकीलाकडून सांगण्यात आले. यावर न्यायालयाने  त्यांना दोन महिन्यांचा अवधी देत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.