सेबी अध्यक्षपदाच्या शर्यतीत शक्तिकांता दास
नवी दिल्ली, दि. 22 - भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी ) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास आणि अन्य दोन अधिका-यांची नावे आहेत. ’’सेबी’’ चे विद्यमान अध्यक्ष यु.के.सिन्हा यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. ते फेब्रुवारी 2011 पासून या पदावर कार्यरत आहेत.
सेबी प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडेकाही जणांनी अर्ज केले आहेत. दास यांच्याव्यतिरिक्त वीज विभागाचे सचिव पी.के.पुजारी आणि अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय त्यागी हेही सेबी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.