इतरांना शिव्या देणारे कधी देश सुधारु शकत नाही: कैफ
मुंबई, दि. 29 - टीम इंडियाचा माजी फंलदाज मोहम्मद कैफनं सोशल मीडियावरुन काहीजणांना एक विशेष मेसेज दिला आहे. ‘जे कायमच दुसर्यांना शिव्या देतात ते कधीच देशाला सुधारु शकत नाहीत.’
‘जी लोकं, हिंदू, मुस्लिम, नेते आणि मीडियाला शिव्या देतात किंवा तसा विचार करतात ती लोकं कधीही देशाला सुधारु शकत नाहीत जरा सुधारा!’ असं मत कैफनं सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. या पोस्टसोबतच मोहम्मद कैफनं एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहलं आहे की, ‘शांत रहा आणि सुधारा’ मोहम्मद कैफ ट्विटर आणि फेसबुकवर कायमच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायमच अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त करत असतो. नुकतंच त्यानं मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पेहराववर टीका करणार्यांना उत्तर दिलं होतं.