आयसीसी वन डे संघाच्या कर्णधारपदी विराट !
नवी दिल्ली, दि. 23 - भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजाला आयसीसीच्या वन डे संघात स्थान मिळालं आहे. इतकंच नाही, तर या टीमचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विराटला आयसीसीच्या कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. भारताकडून एकट्या रवीचंद्रन अश्विनचाच आयसीसीच्या कसोटी संघात समावेश झाला आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड, दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीवीर गॅरी कर्स्टन आणि श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर कुमार संगकारानं या संघांची निवड केली आहे.
निवड करण्यासाठी सप्टेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीतल्या कामगिरीचा आधार घेण्यात आला आहे. या दरम्यान विराटने आठ कसोटीत 45 च्या सरासरीने 451 धावा केल्या असून त्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. दुसरीकडे वन डेत विराटने 62 च्या सरासरीने 1038 धावा केल्या आहेत. तर ट्वेन्टी-20 मध्ये त्याने तब्बल 85.62 च्या सरासरीने 685 धावा केल्या.