गिरीष बापटांची चरबी आणि माज उतरवणार : राज्यमंत्री विजय शिवतारे
पुणे, दि. 27 - पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभाला न बोलावल्याने जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टीका करताना विजय शिवतारे यांचा तोल मात्र घसरला. ‘गिरीष बापटांची चरबी आणि माज उतरवणार’ अशा शब्दात शिवतारे यांनी गिरीष बापटांवर तोंडसुख घेतलं.
पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. पुण्यातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना भूमिपूजन सोहळ्याला न बोलवल्यानं त्यांनी भाजपच्या गिरीष बापटांवर जोरदार टीका केली आहे.