Breaking News

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश निश्‍चित आमदार जगताप

पुणे, दि. 27 - केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकचे स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात येणार  असल्याचे जाहीर केले आहे. पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसाठी सादर केलेल्या प्रस्तावात सुधारणा करण्यास केंद्राने सांगितले होते. त्याच धर्तीवर  पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही आपल्या प्रस्तावात सुधारणा करून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी फेरप्रस्ताव सादर करावे, असे नायडू  यांनी सांगितले आहे. त्यामुळे  असा प्रस्ताव सादर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत निश्‍चितपणे समावेश होणार आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण  जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खा. अमर साबळे, आ. महेश लांडगे, भाजप शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, महिला शहर आघाडी अध्यक्षा  शैला मुळक, सदाशिव खाडे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.आमदार जगताप म्हणाले, पुणे आणि  पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. यावेळी  उपस्थित असलेले शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.