नववर्षात निवडणुकाचं बिगुल वाजणार, लवकरच निवडणूक तारखा जाहीर होणार!
मुंबई, दि. 27 - नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणार आहे. कारण लवकरच 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी सुत्रांची माहिती आहे.
राज्यातील 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुका 7 जानेवारीला घोषित होण्याची शक्यता आहे. एकूण चार टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रात अंतिम मतदार यादी घोषित होण्याची तारीख 5 जानेवारी आहे. तर महापालिकांनी मुदत संपण्याआधी आणि नवीन महापौर निवड ही 8 मार्चच्या आधी करायची आहे. त्यामुळे 7 जानेवारीला निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. तसेच 15 ते 22 फेबुवारी मध्ये चार टप्प्यात होणार मतदान होण्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. ज्या जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे. तिथे एकत्र मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर तुमच्याकडे जन्म तारखेचा पुरावा नसेल तर मतदान यादी समावेश असलेल्या तुमच्या आई-वडिलांच्या हस्ताक्षरात वयाची माहिती लिहून देऊ शकतात. यासाठी फक्त तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे.