बिहारमधील बक्सर कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन
बक्सर, दि. 31 - बिहारमधील बक्सर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी काल मध्यरात्री पलायन केले. प्रजित सिंग, गिरीधारी राय, सोनु पांड्ये, उपेंद्र साह आणि सोनू सिंग अशी या पाच कैद्यांची नावे आहेत. यातील सोनू सिंगला 10 वर्षाच्या कारावासाची तर इतर चार जण आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
‘धुक्याचा फायदा घेऊन रात्री 12 ते 3 च्या दरम्यान या कैद्यांनी पलायन केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारागृहाची भिंत ओलांडून हे कैदी पसार झाले. या भिंतीजवळ लोखंडी सळी, पाईप आणि धोतर या गोष्टी सापडल्या आहेत. सध्या शोधमोहिम सुरू असल्याची’, अशी माहिती अधीक्षक उपेंद्र सिंग पोलिसांनी दिली.