Breaking News

70 कोटींचा काळा पैसा पांढरा करणार्‍या वकिलाला दिल्लीत बेड्या

नवी दिल्ली, दि. 30 - काळा पैसा खपवणं आणि नोटाबदलीप्रकरणी दिल्लीतील वकील रोहित टंडनला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ईडी अर्थात अंमलबजावणी  संचलनालयाने रोहित टंडनला अटक केली.
नोटाबंदीनंतर बँक अधिकार्‍यांसोबत मिळून 70 कोटींचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप रोहित टंडनवर आहे. रोहित टंडनने पांढरा केलेला पैसा हा राजकारणी  आणि अधिकार्‍यांचाही असू शकतो, अशी शंका ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे रोहित टंडनच्या लॉ फर्मवरुन 13.65 कोटींच्या नव्या नोट जप्त करण्यात आल्या  होते. कोलकातामधील उद्योजक पारसमल लोढाने रोहित टंडनला मदत केल्याचा आरोप आहे. लोढाच्या चौकशीनंतरच टंडनला अटक केली आहे.