मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 4 वाहनं एकमेकांवर धडकली
रायगड, दि. 27 - मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रेलर, एक कार आणि एका ट्रकचा अपघातग्रस्त वाहनांमध्ये समावेश आहे.
एक्सप्रेस वेच्या मुंबईकडे येणार्या लेनवर चार गाड्या एकमेकांवर धडकल्या. दोन ट्रेलर, एक ट्रक आणि एक कार अशी चार वाहनांमध्ये हा अपघात झाला. यातील एका मोठ्या ट्रेलरवर लोखंडी सळ्या होत्या. त्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अजून एक जण गाड्यांखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. तर या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एका लेनने धीम्या गतीने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.