पुणे वनडे सामन्याच्या तिकीटांची अवघ्या 12 दिवसात विक्री!
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये 15 जानेवारीला होणार्या सामन्यानंच या वन डे मालिकेच्या लढाईला तोंड फुटणार आहे. 37 हजार क्षमतेच्या या स्टेडियममधला हा दुसराच वन डे सामना असणार आहे. याआधी 13 ऑक्टोबर 2013 रोजी या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियामधला वन डे सामना कांगारूंनी 72 धावांनी जिंकला होता.