Breaking News

नोटाबंदीनंतर बसपाच्या खात्यात तब्बल 104 कोटी रुपये जमा

लखनऊ (उत्तर प्रदेश), दि. 27 - बहुजन समाज पक्ष आणि बसपच्या प्रमुख मायावती यांच्या बँक खात्यांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. आयकर विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ईडीने दिल्लीतील युनियन बँकेच्या खात्यांच्या केलेल्या चौकशीत मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या खात्यात 1 कोटी 43 लाख आणि बसपच्या खात्यात 104 कोटी 36 लाख रुपये जमा झाल्याचे उघड झालं. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात रणशिंग फुंकणार्‍या मायावतींसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर रक्कम जमा करण्यात आल्याने या रकमेविषयी संशय बळावला आहे. जमा झालेल्या रकमेचे स्रोत उघड झाल्यानंतर पुढील चौकशी होणार आहे. आनंद कुमार यांच्याविरोधात आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या बँक खात्यात एकूण 104 कोटी 36 लाख रुपये जमा झाले. विशेष म्हणजे रोख रकमेच्या स्वरुपात सर्व पैसे जमा करण्यात आले.