Breaking News

स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट लॉन्च, नव्या फीचर्ससह नवा लूक

मुंबई, दि. 04 - स्कोडाने रॅपिड सेडानचे फेसलिफ्ट मॉ़डेल लॉन्च केले आहे. या कारची किंमत 8 लाख 34 हजार रुपयांपासून सुरुवात होते, ते 12 लाख 67 हजार रुपयांपर्यंत आहे. ह्युंदाई वर्ना, होंडा सिटी, फॉक्सवेगन वेंटो आणि मारुती सुझुकी सियाज यांसारख्या कारना स्कोडा रॅपिड फेसलिफ्टची स्पर्धा असेल.
रॅपिड फेसलिफ्टला फॉक्सवेगन वेंटोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. डिझाईनच्या बाबतीत अत्यंत शार्प आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्कोडा ऑक्टाव्हिया आणि स्कोडा सुपर्ब यांच्या डिझाईनचाही थोडा स्पर्श रॅपिड फेसलिफ्टला झालेला आहे. मात्र, या कारच्या पुढील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप्स आणि डे-टाईम रनिंग लाईट अत्यंत नव्या लूकमध्ये दिसतील. एअर डॅमवर हनीकॉम्ब डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. बाजूंना नवे अलॉय व्हिल्स लावण्यात आले आहेत. तर मागील बाजूस फार काही बदल करण्यात आले नाहीत. मात्र, टेललॅम्प्स, बंपर, विंग मिररसोबत इंडिकेटर आणि मजबूत एंटिना इत्यादी देण्यात आले आहे.