Breaking News

जलयुक्त अभियान केवळ कागदावरच : धस

जामखेड (प्रतिनिधी) । 04 - संधारणमंत्री व मुख्यमंत्र्यांच्याकडून जलयुक्त अभियानाचा केवळ बोलबाला केला जात असून, ही फसवी योजना आहे. केवळ  कागदावरच कामे दाखविण्यात आली आहेत. हे जलयुक्त नव्हे, तर गाळयुक्त अभियान आहे,अशी टीका माज़ी महसूलराज्यमंत्री सुरेश धस यांनी केली.
 तालुक्यातील अरणेश्‍वर दूध संस्थेच्या वतीने दूधउत्पादकांना माज़ीमंत्री धस यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त बोनस वाटप करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.या  वेळी महिला बालकल्याण समितीचे सभापती दत्तात्रय वारे, चेअरमन प्रदीप पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ राऊत, संचालक सोले पाटील,माजी  सरपंच सखाराम भोरे,सरपंच बापूराव ढवळे, उपसरपंच गफारभाई पठाण, माजी सरपंच व अरणोश्‍वर दूध संकलन केंद्राचे चेअरमन संतोष निगुडे, रामकिसन  जायभाय, नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे, अँड़ शिंदे आदी उपस्थित होते. श्री. धस पुढे म्हणाले, मतदारसंघात नवीन नेत्रृत्व निर्माण  होऊ नये म्हणून पालकमंत्री शिंदे यांनी कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांचे सहा गट तयार करून मिरजगाव गट अपवाद  वगळता सर्व गट राखीव केले आहेत. जलसंधारणमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून जलयुक्त अभियानाचा केवळ बोलबाला केला जात आहे. ही फसवी योजना असून, केवळ  कागदावरच कामे दाखविण्यात आली आहेत. हे जलयुक्त नव्हे तर गाळयुक्त अभियान आहे. शेतकर्यांच्या प्रश्‍नांची जाण नसणारे सरकार शेतकर्यांच्या मालाला  हमीभाव देऊ शकत नाही. या सरकारने कांद्याला केवळ एक रुपया अनुदान दिले आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति किलो दहा रुपये खर्च येतो. त्याप्रमाणे कांदा व  इतर शेतमालाला चांगला भाव दिला पाहिज़े. शेतकरी जगला तरच देश टिकेल. अरणोश्‍वर दूध संकलन केंद्राने लिटरमागे दीड रुपयाप्रमाणे कमिशनमधून पंधरा पैसे  बोनस दिला ही कौतुकास्पद बाब आहे. यापुढे अरणोश्‍वर दूध संकलन केंद्राकडून उचल न घेणार्या दूध उत्पादकांना पुढीलवर्षी पंचवीस पैसे बोनस देण्याची घोषणा  धस यांनी केली.