विद्युत अभियंत्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मेळावा
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : बेरोजगार विद्युत अभियंत्यांना महावितरण कंपनीमार्फत देखभाल व दुरुस्तीची कामे थेट लॉटरी पध्दतीने देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी विद्युत कंत्राटदाराचे लायसन्स आवश्यक असून ते मिळविण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयाने कल्याणी रिसॉर्ट, कॉन्फरंस हॉल, जुनी एमआयडीसी, सातारा येथे 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या निरीक्षकांनी दिली.
देखभाल व दुरुस्तीची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना महावितरण कंपनीमार्फत देण्यात येणार असून या कामांची माहिती महावितरण कंपनीचे प्रतिनिधींमार्फत मेळाव्यात देण्यात येणार आहे. तसेच सुशिक्षीत बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या मंडळ कार्यालयात अर्ज करावेत. या मेळाव्याचा जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्युत निरीक्षकांनी केले आहे.