भगवानगडावर शक्तीप्रदर्शन नव्हे, भक्तीप्रदर्शन : एकनाथ खडसे
मुंबई, दि. 12 -भगवान गडावर शक्तीप्रदर्शन नसून भक्तीप्रदर्शन आहे, असे म्हणत राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडेंचा स्वभावच संघर्षाचा असल्याचे म्हणत खडसेंनी पंकजा मुंडेंचे कौतुकही केले आहे.
भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केली होती. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक भगवान गडावर येत असतात. यंदा पंकजाताईंच्या नेतृत्त्वाखाली सर्वच्या सर्व भाविक भगवान गडावर आले आहेत., असे खडसे म्हणाले. भगवान गडावर जाऊन भगवान बाबांचे दर्शन घेणे हा सर्वांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे हे शक्तीप्रदर्शन नसून भक्तीप्रदर्शन आहे., असेही खडसे यांनी नमूद केले.