Breaking News

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेला ट्रक पेटवला !

कोल्हापूर, दि. 21 -  गळीत हंगामाच्या तोंडावरच ऊस आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाने भरलेला ट्रक पेटवून दिला. ऊसदर निश्‍चित होण्यापूर्वीच गळीत हंगाम सुरू केल्याने, स्वाभिमानीने आक्रमक पवित्रा घेतला. गाळपासाठी ऊसाने भरलेला ट्रक वारणा कारखान्याकडे जात होता. त्यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट ट्रक पेटवला. नरंदे ते सावर्डेदरम्यान ही घटना घडली आहे.