पंकजांकडून धनंजय मुंडेंचे सांत्वन
बीड, दि. 14 - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडीतअण्णा मुंडे यांचे काल दीर्घ आजारानें निधन झाले. परळी जवळच्या कन्हेरवाडीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पंडितअण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे थोरले बंधू होते.
पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पंकजा मुंडेही आल्या होत्या. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांना आधार दिला. सर्व राजकीय द्वेष, आरोप विसरून दोघांनीही या दुःखद प्रसंगी भेट घेतली. पंकजा मुंडेसोबत प्रितम मुंडेंनीही धनंजय मुंडेंची भेट घेतली. आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.