Breaking News

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा नितीशकुमार योग्य - लालूप्रसाद यादव

पाटणा, दि. 18 -  राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी योग्य नसून या पदासाठी नितीश कुमार योग्य असल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी  म्हटले आहे. लालू यांनी असे वादग्रस्त विधान करत काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्षमुलायम सिंग यादव, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिऴनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांमध्ये पंतप्रधान होण्यासाठी आवश्यकते गुण असल्याचेही लालूप्रसाद यांनी सांगितले.