Breaking News

लता मंगेशकर ‘बंग विभूषण’ पुरस्काराने सन्मानित होणार

कोलकाता, दि. 18 -  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘बंग विभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी केली आहे.
हा पुरस्कार राज्य सरकारच्या सन्मानसोहळ्याच्या वेळी देण्यात येतो, मात्र लतादीदींची प्रकृती ठिक नसल्याकारणाने मुख्यमंत्री स्वत: लता मंगेशकर यांच्या घरी जाऊन पुरस्कार देणार आहेत.