मुख्यमंत्री बायकांप्रमाणे भांडतात : सुप्रिया सुळे
पुणे, दि. 29 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा-वसावसा भांडतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यातील मावळ येथील महिला मेळव्यात बोलत होत्या.
हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतो. आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फारकाही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठ आणि त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठे आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच कधी त्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावे काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील, असे म्हणत सुप्रियांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.