संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे
मुंबई, दि. 29 - ‘सामना’मधील कार्टून वादानंतर सर्वच पक्षांतून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे दिसेल तिथे त्याला फटके टाकणार’ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘सामना’मधील कार्टून वादावर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडले आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असे नाही, असे म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला.
‘सामना’तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असे नाही. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचे हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.