चित्तथरारक कुस्त्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले
। राजेंद्र देशमुख मित्रमंडळाच्यावतीने कुस्त्या हंगामाचे आयोजन । ग्रामस्थांची मोठी हजेरी । राशीन यात्रेची सांगता
राशीन (प्रतिनिधी) । 27 - येथील काशी विश्वेश्वर रथयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी हगाम्यात अनेक नामवंत मल्लांनी चमकदार कुस्त्या करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हजारो ग्रामस्थांनी या हगाम्याला हज़ेरी लावली. या वेळी अनेक चमकदार कुस्त्या झाल्या.येथील रथयात्रेनिमित्त सुरू असलेली हगाम्याची परंपरा गेल्या चार वर्षांपासून बंद पडली होती. यंदाच्या वर्षी युवक नेते राजेंद्र देशमुख मित्र मंडळाच्या वतीने कुस्त्यांच्या हंगाम्याचे आयोजन केले होते. यामध्ये शेवटची कुस्ती विजय घुटाळ व कौतुक वाकळे यांच्यात एक लाख अकरा हजार रुपयांवर लावण्यात आली होती. ती बरोबरीत सोडण्यात आली. विक्रम शेटे व औदुंबर मासाळ यांच्यात झालेल्या कुस्तीत विक्रम शेटेला विजयी घोषित करण्यात आले.
याशिवाय संतोष गायकवाड, सुहास गोडगे, वैभव शेटे, किरण नलावडे, प्रशांत जगताप, अजित शेळके, कुलदीप पवार,अक्षय काळे, केशव मोढळे, बाळू कानगुडे, गणेश गदादे, विकास तोरडमल, राम काळे, भाऊ कचरे, नागेश गायकवाड, उदय काशीद, अमोल कचरे यांच्यासह अनेक मल्लांनी चमकदार कुस्त्या केल्या. लहान मल्ल प्रदीप जानभरे व गणेश वाल्हेकर यांनी चमकदार कुस्त्या करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. प्रवीण घुले, उप महाराष्ट्रकेसरी विजय मोढळे, बप्पाजी धांडे, विशाल देशमुख, उपनगराध्यक्ष नाना कुलथे, मेजर नेटके, मा. जि.प. सदस्य दादा कानगुडे, पै. दत्ता गायकवाड, शाम कानगुडे, विक्रम राजेभोसले, बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, प्रकाश शिंदे, पै. विलास काळे, शिवकुमार सायकर, ज्ञानेश्वर सायकर, तात्या माने, अशोक जंजिरे, दीपक काळे, सतीश शेळके, विजय तोरडमल, पांडुरंग भंडारे, दत्तात्रय गोसावी, स्वप्नील मोढळे, संतोष देवगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून पै. सुरेश मोढळे, भागवत दंडे, अजित मोढळे, प्रसाद कानगुडे, रवी दंडे, राजेंद्र मोढळे, विजय मोढळे, सतीश दंडे, बाळू मराळ यांनी काम पाहिले.
