विम्बल्डन : फेडरर उपांत्यापूर्व फेरीत
लंडन, दि. 05 - 2012 पासून कोणतेही ग्रँडस्लॅम जिंकू न शकरणार दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. या दिमाखदार कामगिरीसह त्याने दिग्गज व महिला खेळाडू मार्टिना नवरातिलोवाच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. त्याचवेळी दुसरीकडे जपानच्या केई निशिकोरी आणि महिलांमध्ये एग्निस्का रादवांस्का यांचे आव्हान संपुष्टात आले.
सात वेळचा विम्बल्डन चॅम्पियन आणि तृतीय मानांकीत फेडररने अमेरिकेच्या स्टिव्ह जॉनसनचा 6-2, 6-3, 7-5 असा पराभव करुन तब्बल 14व् यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तसेच यासह फेड एक्सप्रेसने दिग्गज नवरातिलोवाने जिंकलेल्या 306 ग्रँडस्लॅम सामने विजयाची बरोबरीही केली. दरम्यान, जपानच्या निशिकोरीला नमवलेल्या क्रोएशियाच्या मारिन सिलिचचे उपांत्यपुर्व फेरीत फेडररपुढे कडवे आव्हान असेल.