एक अलबेला’ आठवड्याभरात मुंबईतून गायब
मुंबई, दि. 06 - भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवान दादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाने समीक्षकांसह, प्रेक्षकांचेही मन जिंकले. मंगेश देसाई याने मेहनतीने साकारलेले मास्टर भगवान आणि हिंदीतील अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली गीता बाली ही जोडी आणि त्यांच्या खास नृत्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. असे असतानाही बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवडयात चार कोटींची घसघशीत कमाई करणारा हा चित्रपट मुंबईतील चित्रपटगृहांतून पहिल्याच आठवडयात काढून घेण्यात आला आहे.
या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते डॉ. मोनीश बाबरे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मला स्वत:लाही धक्का बसला आहे. मला काहीही न कळवता हा चित्रपट काढून घेण्यात आला आहे. भगवान दादांवरील अतिव प्रेमामुळे मी या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचं इतकं भरभरून कौतुक होत असताना असे का घडले हेच मला समजत नाही,’ असे त्यांनी सांगितले.