ब्रेक्झिट जगासाठी चांगले नाही : अरुंधती भट्टाचार्य
न्यूयॉर्क, दि. 06 - ब्रेक्झिटनंतर भारताला युरोपीय महासंघ आणि ब्रिटनशी नव्याने व्यापारी करारांबद्दल फेरतपासणी करून फेरवाटाघाटी कराव्या लागतील, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. जागतिकीकरणाच्या रेटयात ब्रेक्झिट हे मागे उचललेले पाऊल आहे,असे त्या म्हणाल्या.
भारताला सर्वात फायदा जागतिकीकरणाचा होईल. ब्रेक्झिट हे खरे तर तुम्ही स्वत:शी जोडले जाण्याच्या प्रक्रियेपासून मागे जात आहात. तात्त्विकदृष्टया पहायचे तर ब्रेक्झिट जगासाठी चांगले नाही, असे त्या म्हणाल्या. सध्या भट्टाचार्य अमेरिकेत असून तिथे त्या गुंतवणूकदारआणि रेटिंग एजन्सीजशी चर्चा करणार आहेत.