Breaking News

कंटेनर-जीप अपघातात नऊ ठार

उदगीर, दि. 18 - तालुक्यातील इस्मालपूरजवळ रविवारी (ता. 17) रात्री सातच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणारी क्रुझर आणि कंटेनरच्या अपघातात नऊ प्रवासी ठार झाल्याची घटना घडली. 
इस्मालपूरजवळ अहमदपूरहून येणारी क्रुझर गाडी (एमएच- 20, एक्यू- 6719) व उदगीरकडून अहमदपूरपकडे जाणारा कंटेनर (एमएच- 04, एएफ- 9604) यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात प्रवास करणार्‍या नऊ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यांची नावे अशी : राकेश नेताजी मादळे (उदगीर), बालाजी कांबळे, नरसिंग सोनवणे (शेल्हाळ), नामदेव शिंदे (इस्मालपूर), लक्ष्मीबाई जाधव, माधव जाधव (एकुर्का), अंतेश्‍वर शिवपुजे (देऊळवाडी), सन्ना दायमी (उदगीर), राजकुमार हलशेट्टे (मुचळंब).