विविध संघटना निषेधासाठी सरसावल्या
राठा संघटनांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्याचा सामुहिक निर्णय घेण्यात आला.याच अनुषंगाने वसमत रोडवर जाहिर निषेध व रास्तारोको करण्यात आले यामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा शिवसैनिक, संभाजी सेना, स्वाभिमानी संघटना, मराठा सेवा संघ, छावा संघटना, लोकराज्य मित्रमंडळ, शिवतेज प्रतिष्ठाण, शिवसंग्राम, शंभुराजे मित्रमंडळ, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, लष्करे शिवबा, मराठा महासंघ, राजे संभाजी मित्र मंडळ, शिवप्रतिंंष्ठाण हिंदुस्थान संघटना, शिवप्रहार, राजे छत्रपती युवा संघटना व मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. कोपर्डी येथिल घटनेने राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे लख्तरे देशाच्या वेशीवर टांगले असुन महाराष्ट्रात स्त्रिंयाना सरंक्षण नसल्यामुळे राज्यात अशा समाजघातक घटना घडत आहेत.राज्यामध्ये गैरकायद्याच्या मंडळींनी कायदा व सुव्यवस्थाचा बोजवारा उडवला असुन सरकार या गुंडाना आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याचे आरेप करत सुमारे दोन तास रास्तारोको करण्यात आले.कोपर्डी येथिल आरोपींना तात्काळ बेड्या ठेकुन कडक शासन करावे अशी मागणी या वेळी करण्यात आली या आंदोलनात नितीन देशमुख, रामदास अवचार, विठ्ठल तळेकर, रामेश्वर शिंदे, प्रविण देशमुख, गजानन जोगदंड, विजय जाधव, अरूण पवार, गंगाराम शिंदे, पवन पारवे, नितिन लोहट, व्यंकट शिंदे, शिवराज जगताप, शंकर देशमुख, शेषराव मोहिते, राजपाल शिंदे, डि.एस. कदम, गंगाधर जवंजाळ आदि उपस्थित होते.