एकत्र तिकीट पद्धत योजनेला ब्रेक
मुंबई, दि. 11 - घडाळयाच्या काटयावर धावणा-या मुंबईकरांचा वेळ वाचावा व प्रवास अधिक वेगवान व्हावा यासाठी एमएमआरडीएने ‘एकत्रित तिकीट पद्धत’ योजना राबवण्याचे ठरवले आहे. या योजनेअंतर्गत मोनो, मेट्रो, उपनगरील रेल्वे सेवा, बस आदी वाहतूक सेवांचा प्रवास एकाच तिकिटावर करणे शक्य होणार आहे.
ही योजना राबवण्यासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीसाठी एमएमआरडीएद्वारे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र कंपन्यांच्या अल्प प्रतिसादामुळे प्रक्रिया रद्द करण्यात आली. पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएद्वारे स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत रोजच्या धावपळीत लोकल, बस आणि मोनो-मेट्रोतून प्रवास करावा लागतो. दरवेळी नवीन वाहतूक सेवेचा वापर करताना नव्याने तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. यामुळे वेळ वाया जातो. प्रवाशांचा हा वेळ वाचावा यासाठी एमएमआरडीएद्वारे मुंबई व महानगर प्रदेशासाठी ‘एकत्रित तिकीट पद्धत’ सुरू करण्याची योजना आखली आहे.