विद्यार्थी सुरक्षा विमा; पालकास धनादेश प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)। 01 - न्यू आर्टस्, कॉर्मस अँण्ड सायन्स महाविद्यालयातील अपघाती मृत्यू झालेल्या कृष्णा काबरे या विद्यार्थ्याच्या पालकास विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेंतर्गत 50 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर महाविद्यालयाने युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनीकडे विमा रक्कम मिळण्यासाठी दावा केला होता. कंपनीने या विद्यार्थ्याचा क्लेम मंजूर करून धनादेश दिला.
मयत कृष्णा याचे पालक मुरलीधर काबरा यांच्याकडे धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे, खजिनदार रा.ह. दरे, जी.के. पाटील, वसंतराव कापरे, प्राचार्य बी.एच. झावरे, उपप्राचार्य प्रा. आर.जी कोल्हे, प्रकल्पप्रमुख शिवाजी साबळे, बी.के. साबळे आदी उपस्थित होते. न्यू आर्टस्, कॉर्मस अँण्ड सायन्स महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे खानदेशे यांनी सांगितले.