Breaking News

देबडवार, चव्हाण, हांडे यांच्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिठ्ठा सादर

एबी सुर्यवंशीच्याही चौकशीची सार्वजनिक इच्छा पुर्ण होणार

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 10 -  मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आणि अधीक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्या भ्रष्टाचाराचा कच्चा चिठ्ठा असलेले शपथपत्र लोकायुक्त आणि लोकउपायुक्तांच्या कार्यालयात तक्रारदारांनी सादर केल्यानंतर साबांत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. इकडे औरंगाबाद साबां मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याही भ्रष्टाचाराची लक्तरे औरंगाबाद विभागीय महसूल याच्या वेशीवर टांगली गेल्याने एकूण साबांच बदनामीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून सार्वजनिक जनहिताची कामे होणे अपेक्षित असल्याने या विभागाला भरघोस निधीची तरतूद केली जाते. सरकारी कार्यालयाची इमारत असो नाही तर अधिकारी कर्मचार्‍यांची निवासस्थाने, रस्ते असोत नाही तर इतर कुठलेही सार्वजनिक बांधकाम, पर्यटन असो नाही तर आदिवासी असो कुठल्याही विभागाचे नवीन बांधकाम असो नाही तर जुन्या कामाची डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फतच ही कामे केली जातात.
अशा प्रकारची व्यापक जबाबदारी असलेल्या हा विभाग अत्यंत महत्त्वाचा असला तरी या खात्यात काम करणार्‍या देबडवार, चव्हाण, हांडे, सुर्यवंशी यांच्या सारख्या भ्रष्ट क्षेत्रीय अभियंत्यांच्या खवैयेगीरीमुळे या विभागाच्या वाट्याला बदनामीच आली आहे. देबडवार, चव्हाण आणि हांडे या अभियंत्यांच्या भ्रष्टाचारामुळे तर सा.बां. अधिकच बदनाम झाला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी ही ‘सार्वजनिक’ इच्छा फलद्रुप होण्याची शक्यता वाढली आहे. या क्षेत्रीय अभियंत्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असलेल्या कच्चा चिठ्ठा तक्रारदार अशोक सोनवणे यांनी शपथपत्रातून लोकायुक्तांकडे सादर केला आहे. हे शपथपत्र दाखल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.
इकडे औरंगाबाद सा.बां. मंडळातही ए.बी सुर्यवंशी यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी म्हणून सुरु झालेले शिवक्रांती युवा सेनेचे धरणे आंदोलन यशस्वी झाले आणि विभागीय महसूल आयुक्तांच्या कार्यालयामार्फत सुर्यवंशी यांच्या सखोल चौकशीचे सुत्रे हलू लागली आहेत.  (क्रमशः)