ऑगस्टमध्ये व्याजदर कपातीची शक्यता
नवी दिल्ली, दि. 05 - जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 6.2 टक्क्यांवर गेला असला तरीही 9 ऑगस्टला होणा-या बैठकीत रिझर्व्ह बँकप्रमुख व्याजाचे दर 25 बेसिस पॉइंट्सनी कमी करण्याची शक्यता आहे. मान्सून कृषी महागाईचा दर कमी करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
प्रमुख जागतिक वित्तसेवा बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने ही शक्यता वर्तवली आहे. चांगल्या मान्सूनमुळे मध्यवर्ती बँक दरकपातीचा पर्याय स्वीकारणार असल्याचे सांगितले जाते. जूनमधील ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित महागाईचा दर 6.2 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
मात्र पाऊस चांगला होत असल्याने महागाईचा दर खाली येणार आहे. त्यामुळेच 2
5 बेसिस पॉइंट्सनी व्याजाचे दर कमी करण्यात येतील, असे आम्ही सांगत आहोत, असेही बोफाने सांगितले. उशिरा आलेला मान्सून आता जोरदार पुढे सरकत असून जूनमध्ये 9 टक्क्यांची तूटही भरून काढण्याची शक्यता आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सूनची प्रगती जशी होईल तसे खरिपाच्या पेरण्या वेग घेतील, अशी अपेक्षा असल्याचे बोफाच्या अहवालात म्हटले आहे.
जूनच्या बैठकीत मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदर स्थिर ठेवले होते. महागाईचे कारण त्यांनी दिले होते. चांगला मान्सून झाला तर व्याजदरात कपात करण्याचे संकेतही दिले होते. उद्योगांना मात्र बँक आणखीही व्याजदरात कपात करण्याची आशा आहे. भाजीपाल्याच्या किमतीत दुहरी आकडयाने वाढ झाल्याने घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर मेमध्ये 0.79 टक्क्यांनी वाढला होता.