Breaking News

6॥ लाखाच्या रसायनाची चोरी, दोघांना अटक

सांगली, दि. 20 - राष्ट्रीय महामार्ग चार वर नेर्ले (ता. वाळवा) येथील हॉटेल राजपुरोहीत समोर टँकर मधून हायड्रोजन पॅरॉक्साईड नावाचे केमीकल विक्री करण्यासाठी काढणार्‍या टँकर चालकांसह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. सचिन राजेंद्र चव्हाण (वय 22), दिपेश प्रकाश निळे (वय 26 दोघेही रा. वळसंग ता. जत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 17 लाख रुपये किंमतीचा एक टँकर, सहा लाख रुपये किमंतीचे हायड्रोजन पॅरॉक्साईड केमीकल असा 22 लाख 72 हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधीक तपासासाठी दोघांना कासेगांव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 पोलीस अधीक्षक दत्तात्रश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना राष्ट्रीय महामार्ग चार वरुन केमीकल वाहतूक करणारे टँकर बाजूला थांबवून त्यातील केमीकल बेकाशदेशीर पणे काढून त्याची विक्री केली जात असल्याची माहीती  मिळाली होती. या माहीतीच्या आधारे अशा टँकर चालकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या पथकाला दिले होते. पाटील यांनी याबाबत गोपनीय माहीती काढली. नेर्ले गावच्या जवळ एक हायड्रोजन पॅरॉक्साईड हे केमीकल घेऊन आलेल्या टँकरमधून टँकरचा चालक बेकायदेशीरपणे छोट्या रबरी पाईपच्या सहाय्याने केमीकल काढून त्यांची विक  करत असल्याची माहीती त्यांना मिळाली. या  माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप निरीक्षक अमितकुमार पाटील व त्यांच्या पथकाने नेर्ले येथील हॉटेल राजपुरोहीत समोर उभ्या असलेल्या टँकर (केए 19 एए 0794) वर छापा टाकला.
यावेळी टँकरचा चालक सचिन चव्हाण हा या टँकरचे कंपनीने केलेले सील न तोडता रबरी पाईपच्या सहाय्याने केमीकल काढत असताना आढळून आला. त्याच्या सोबत दिपेश निळे हाही होता. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी केमीकल काढून विक्री करण्याच्या उद्द्ेशाने हे कृत्या केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून टाटा कंपनीचा एक 17 लाख रुपयांचा टँकर, त्यामध्ये असणारे 5 लाख 72 हजार रुपयांचे 20 टण हायड्रोजन पॅरॉक्साईड हे केमीकल असा सुमारे 22 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना कासेगांव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार राजेंइद्र कदम, पाहेकॉ अशोक जाधव, मारुती साळुंखे, डगळे, पिरजादे, महाजन, सचिन सुर्यवंशी, किशोर काबुगडे यांनी या कारवाईत सहाभाग घेतला.