Breaking News

जूनमध्ये सरासरीपेक्षा 11 टक्के कमी पाऊस

नवी दिल्ली : 01 -  पावसाळयाच्या चार महिन्यांपैकी पहिल्या जून महिन्यात पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा कमी पडला. संपूर्ण देशभरात पाऊस 11 टक्के कमी पडला असे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनला ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा आठ दिवस उशिराने दाखल झाल्याने ही तूट निर्माण झाली. मान्सूनने बर्‍यापैकी प्रगती केली असली तरी, मध्यभारतात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. पण जुलैमध्ये ही तूट भरुन निघेल असे भारतीय हवामान खात्यातील मान्सनूचा अंदाज वर्तवणार्‍या डीय शिवानंद पाई यांनी सांगितले. जुलै महिन्यात मान्सून अधिक सक्रीय होईल अशी हवामान खात्याला अपेक्षा आहे.