Breaking News

तांदळाच्या आधारभूत किमतीत वाढ

नवी दिल्ली, दि. 01 - आगामी खरीप हंगामात (2016-17) तांदळाच्या आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्र सरकारने प्रतिक्विंटल 60 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे तांदळाला चौदाशे सत्तर रुपयांचा दर मिळणार आहे.
तांदळाच्या आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीच्या (सीसीईए) बैठकीत घेण्यात आला. तसेच डाळींच्या उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने डाळींच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे. 2015-16 मध्ये विविध प्रकारच्या तांदळाच्या ग्रेड‘साठी वेगळी आधारभूत किंमत निश्‍चित करण्यात आली होती. सर्वसाधारण तांदळासाठी प्रतिक्विंटल 1410 रुपये तर ए ग्रेडच्या तांदळासाठी प्रतिक्विंटल 1450 भाव देण्यात आला होता. चालू वर्षात खरीब हंगामासाठी ए ग्रेडच्या तांदळाला प्रतिक्विंटल 1510 रुपयांचा भाव देण्यात आला आहे.