खडसेंचे महसूलमंत्रीपद धोक्यात?
नवी दिल्ली, दि. 16 - सध्या आरोपांच्या गर्तेत अडकलेले महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होणार्या आरोपांच्या फैरींमुळे केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रासले असून निष्पक्ष चौकशीच्या कारणाने खडसे यांच्याकडून महसूल विभागाची जबाबदारी काढून घेतली जाण्याची शक्यता आहेत. ही कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभर सोहळे साजरे केले जात आहेत. या कार्यक्रमात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचे ठासून सांगितले जात आहे. मात्र खडसेंवर एकापाठोपाठ एक आरोपांच्या फैरी झाडत असल्याने भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात अडचणीत येत असल्याची केंद्रीय नेतृत्वाची भावना आहे. पक्षाची भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा अधोरेखित करण्यासाठी खडसे यांची चौकशी झाली पाहिजे; अशी केंद्रीय नेतृत्वाची भावना आहे.
सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्याबद्दलचे कार्यक्रम आठवडाभर सुरू राहणार असून तोपर्यंत खडसे यांना अभय मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी त्यांच्याकडून महसूल विभागाची जबाबदारी काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणारे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण धसास लावण्याची जबाबदारी केंद्रीय नेत्यांनी सोपविल्याची माहिती आहे.