Breaking News

आदर्श गाव खोर येथे आरोग्य शिबीर संपन्न

बुलडाणा, दि. 0 9 -आदर्श गाव योजनेमध्ये निवड झालेल्या खोर या गावामध्ये आदर्श गाव जनजागृती व ग्रामविकास सप्ताह राबविण्यात येत आहे. याच सप्ताहामध्ये 3 जून 2016 रोजी नवजात बालक व गर्भवती महिलांचे तपासणी शिबीर घेण्यात आले. सदर शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा यांच्या  सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. शिबीरात डॉ. निलेश राउत, संरपंच ज्ञानेश्‍वर वाघ, उपसरपंच तुकाराम मैंद, दिपक हाके, ग्रा.प.सदस्य प्रविण सर्दड, आदर्श गाव समिती अध्यक्ष सुरेश वैष्णव, आरोग्य सहाययक गाढेे आरोग्य सेवक एडी भुतेकर, आरोग्य सेवीका सौ पैठण आरोग्य सेविक मनिषा धांडे,यांची प्रमुख उपस्थिती होते.
आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खोर या गावाने आदर्श गाव होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. आदर्श गाव योजना महाराष्ट्रभर पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखील राबविण्यात येत आहे. ही योजना खेडयांच्या विकासाला नवा आकार नवचैतन्य देवून महत्वकांशी योजना आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या गावक-यांनी सामाजिक विकासाच्या विविध अंगामध्ये अत्यंत भरीव प्रगती केलेली असल्याचे दिसून येते. गाव स्वंयपूर्ण व स्वावलंबी होण्यासाठी शासनाने व गावक-यांनी उत्स्फुर्त सहभाग दाखविलेला आहे. म्हणून दिनांक 1 जून ते 7 जून 2016 या कालावधीत आदर्श गाव जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 3 जून रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या आयोजनासाठी गावक-यांनी परिश्रम घेतले.