‘याड लागलं’ऐवजी ‘झाड लावलं’ ही भूमिका असेल तर वृक्ष संवर्धन जड नाही
बुलडाणा, दि. 09 - ‘मनात झाड लावल्याशिवाय, जमीनीत झाड उगवणार नाही’ ही संकल्पना व ‘याड लागलं’ ऐवजी ‘झाड लावलं’ ही भूमिका असेलतर वृक्ष संवर्धन व संगोपन काहीही जड नाही. त्यात बुलडाणा येथे पर्यावरण मित्रांनी वाढदिवशी वृक्षारोपणाची सुरु केलेली चळवळ म्हणजे, भावनांचे संगोपन.. असल्याचे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ व अतिरिक्त पोलिस अधिक्षिका श्वेता खेडकर यांनी व्यक्त केले.
बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्या वाढदिवसा निमित्त सोमवार 6 जून रोजी स्थानिक पत्रकार भवन परिसरात सायंकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शेनफडराव घुबे, पत्रकार सोमनाथ सावळे, सौ.गायत्री काळे व त्याच दिवशी ज्यांचा वाढदिवस होता त्या जिल्हा सैनिकी अधिका-यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभाताई मिलींदकुमार बडगे आदी उपस्थित होते.
पत्रकार रणजीतसिंह राजपूत यांनी आयोजनामागची भूमिका विषद केल्यानंतर पर्यावरण मित्र, ही संकल्पना आरंभी देवेंद्र खोत यांनी विषद केली. यावेळी पत्रकार अरुण जैन, अजय बिलारी, भानुदास लकडे, लक्ष्मीकांत बगाडे, चंदु बदें, संजय काळे, सुखनंदन इंगळे, प्रेमकुमार राठोड, गजानन धांडे, संदीप शुक्ला यांच्यासह अरिहंत व वर्धमान अर्बन बँकेचे अध्यक्ष जितेंद्र एन. जैन आदी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यानंतर परिसरात वृक्ष लावण्यात आले. यावेळी चंद्रकांत काटकर, देवेंद्र खोत, मिलींद चिंचोळकर, अरविंद होंडे, विनायक भाग्यवंत, मोहन प-हाड, हर्षल जोशी, अनुप श्रीवास्तव, रवि गणेशे, नितीन श्रीवास, मनोज बेराड आदी प्रामुख्याने हजर होते.