Breaking News

’आयपीएल’प्रमाणेच तमिळनाडूमध्ये ’टीएनपीएल’

चेन्नई, दि. 10 -  इंडियन प्रीमियर लिग‘ क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे. 

स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीएनपीएल आयोजित करण्यात येणार आहे. या मागे (टीएनपीएल) दोन उद्देश आहेत. एक म्हणजे तमिळनाडूमधील खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे आयपीएल किंवा इतर कोणतीही टीम त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्यांचे भविष्य घडेल. दुसरे म्हणजे क्रिकेट हा केवळ शहरातील खेळ असून चेन्नईपुरताच मर्यादित असल्याचे समज दूर होऊन तमिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यांत क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल.‘, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सदस्य एन. श्रीनिवासन यांनी दिली.