लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ शक्य
। माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 10 - वृक्षारोपन चळवळ उभी करता असतांना त्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो. लोकांनी जर मनावर घेतलं तर परिसर हरितमय झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे फळ आपल्याला काही आवधीतच मिळते. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष आपल्या दारापुढे लावून त्याचे संगोपन चांगल्याप्रकारे करावे. निश्चितच काही दिवसांनी आपण लावलेल्या वृक्षाचे आपल्याला फायदे मिळतील, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केले.प्रभाग क्र.30 वसंत विहार कॉलनी येथे ‘गो ग्रिन नगर-मैत्री 93-सकल राजस्थानी युवा मित्र’ यांच्यावतीने परिसारामध्ये वृक्षारोपण करुन टी गार्ड लावण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, धनेश कोठारी, सुशिल ओस्तवाल, सिद्धांत कुमट, विकास सुराणा, सनय ताथेड, यश कोठारी, तुषार लोढा, चिराग बडेरा, आशिष देसर्डा, अमोल कराळे, पिंटू गिते, अंकित भन्साळी, जितेंद्र निकम, विजय गजभिव, भैय्या फुलसौंदर, नितीन कदम, प्रशांत बोकरीया, किरण आहिरराव, धनंजय भंडारी, संजय वाघ, गांधी आदि उपस्थित होते. पुढे बोलताना फुलसौंदर म्हणाले की, या गो ग्रिन नगर या संस्थेच्यावतीने नगरमध्ये राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या या उपक्रमास सहकार्य करुन आमच्या परिसारात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी परिसरातील नागरिकांचाही सहभाग घेतला आहे. तसेच या वृक्षांची जबाबदारी समोरच्या घरांवर दिलेली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुशिल ओस्तवाल म्हणाले, आमच्या संस्थेच्यावतीने शहराच्या विविध भागात वृक्षारोपणाचा वसा घेतला आहे. ज्या भागातील प्रतिष्ठीत, सर्वसामान्य किंवा संस्थेच्यावतीने आमच्याशी संपर्क करुन हा उपक्रम राबविण्याबाबत सांगितले जाते त्या भागात हा उपक्रम संबंधितांच्या सहकार्याने सुरु आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हावयाचे आहे, त्यांनीही आमच्याशी संपर्क करुन आपल्या भागात वृक्षारोपण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.